मुंबई (वृत्तसंस्था) – ठाण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एका 6 महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली आहे. या बाळाला आज ठाण्यातील सिविव्हिल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आलाय. 14 एप्रिलला ठाण्यात राहणाऱ्या या लहान बाळाला आणि त्याच्या आईची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यात बाळ्याच्या आईचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले होते तर सदरील बाळाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान आज त्याचे सर्व कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानं त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळेस ठाणे सिव्हील हॉस्पिटल मधील सर्व नर्स, डॉक्टर, आणि कर्मचाऱ्यांनी या बाळाला टाळ्या वाजवून निरोप दिला. दरम्यान या सहा महिन्याच्या बाळाच्या आईची चाचणी निगेटिव्ह आली असताना त्याची चाचणी पॉझिटिव्ह कशी आली या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाहीये. या बाळाची चाचणी कुठे आणि कोणी केली होती? याबाबत काही चौकशी केली जाणार का? असा प्रश्न आता विचारला जातं आहे.







