पाचोरा -(प्रतिनिधी) – येथे दि. 7 एप्रिलरोजी सकाळी 9 वाजेपासून सायंकाळपर्यंत पीबीसी -मातृभूमी कार्यालया जवळ, लक्ष्मी प्लाझा, भुयारी मार्ग या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तालुका प्रशासन, पीबीसी, मातृभूमी वृत्तवाहिनी, प्रमोद बारी मित्र परिवाराने या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कर्तव्य समजून नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान शिबिरात रेडक्रॉस सोसायटी मार्फत रक्त संकलन करण्यात येणार आहे. रक्तदानाच्या ठिकाणी सोशल डिस्टंग्सिंग पाळली जाईल. गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. प्रत्येकाला वेगवेगळी वेळ देण्यात येईल. ज्या व्यक्तींना रक्तदान करायचे असेल त्यांनी खालील मोबाइल क्रमांकावर फोन करून नोंदणी करावी. रक्तदात्यांना रेडक्रॉस संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. पूर्व नाव नोंदणी केलेल्यांना दात्यांनाच रक्तदान करता येईल. ऐन वेळेवर कुणालाही रक्तदान करता येणार नाही, असेही आयोजकांनी सांगितले.
तपशीलवार माहितीसाठी प्रमोद बारी, (संपादक, साप्ता. जनलक्ष्य -9860264374), प्रवीण ब्राह्मणे,(पीबीसी मातृभूमी -9881744656) , प्रा .अमोल झेरवाल- 9975740999, समाधान मुळे -9665949211, योगेश पाटिल, (न्यूज झेप इंडिया -9767211000), राजेश धनराळे, (आर के न्यूज,- 9850494371) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रा.संदीप केदार , नितिन पाटील ,विजय पाटील ,सुनील पाटील, संदीप मराठे, मनोज महाजन, रजत चौधरी, आश्विन महाजन, प्रकाश मराठे, रिजवाण पठाण, वीरेंद्र चौधरी, मिलिंद तायडे, लखन वाघ यांनी केले आहे.
पाचोरा तालुका मेडिकल डीलर्स असोसिएशन पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, माजी सैनिक संघ, श्यामकांत सराफ, विनायक दिवटे, अनिल येवले, शांताराम चौधरी, निखिल मोर, प्रमोद पाटील, नंदकुमार शेलकर, दिलीप जैन, आत्माराम गायकवाड , महेश कौंडिण्य, सुरेश तांबे राहुल महाजन, नगराज पाटील, किरण अहिरे, कु.सायली पाटील, विनोद पाटील, गौतम सोनवणे हे आयोजनासाठी सहकार्य करणार आहेत.