मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता. आता यात वाढ झाली असून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर गेला आहे. गेल्या २४ तासांत ४७ रुग्ण वाढले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. अर्धी मुंबई कोरोनाच्या विळख्यात आहे. तसेच कोरोनाचा धोका हा झोपडपट्टीतील लोकांना आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. चैत्यभूमीजवळच्या सूर्यवंशी हॉलमागील दिनकर अपार्टमेंटमध्ये हा रुग्ण सापडल्यानंतर ही इमारत सील करण्यात आलीय. कोरोना बाधित ६० वर्षीय रुग्णाला हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर त्याची पत्नी आणि मुलाची चाचणी करुन होम क्वारंटाईन केलं आहे.