मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वानी धर्म, जात, पंत, भाषा बाजूला ठेऊन एकत्र योगदान देण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही केले आहे. येणारी महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच आपल्या घरातच पूजाअर्चा करावी असे ते म्हणाले. ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तो विभाग सील करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली, डॉक्टर, पोलिस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. तुम्ही हि तुमचे घरातच राहून योगदान द्याल हवे. राज्यात गरिबांना रेशनदुकानांमधून धान्याचे वितरण करण्यात येत आहे. बोटावर मोजण्या इतक्या नागरिक अजूनही कायदयाचे पालन करताना दिसत नाही असेही त्यांनी सांगितलं. याच नागरिकांमुळे कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते.