अमळनेर (प्रतिनिधी) – देशांत कोरोनाचे संकट त्यांत झालेल्या लॉकडॉनमुळे गरीब कष्टकऱ्यांपुढे निर्माण झालेला उपजीविकेचा प्रश्न आदी समस्या डोळ्यासमोर ठेऊन माजी आ.शिरीष चौधरींनी उद्या 4 एप्रिल रोजी येणारा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेऊन भुखेल्याना अन्नदान करण्यासाठी 51 हजारांची भरीव अशी मदत दिली आहे.
अमळनेर मतदारसंघात अनेकांचा रोजगार बुडाल्याने त्यांना दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण झाले आहे.यासाठी अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते मदतीचा हात देत आहेत. गोरगरीब व गरजूना अन्नदानाचे मोठे नियोजन केले आहे.हा स्तुत्य उपक्रम माजी आ. शिरिष चौधरी यांनाही रुचल्याने त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोक्षेत्र प्रतिष्ठानसाठी 51,000/-रुपये पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.व सर्व कार्यकर्त्याना देखील कोणताच कार्यक्रम न घेण्याचे आवाहन करून जनतेच्या मदतीसाठी विधायक कार्य करण्याचे सूचित केल.दरम्यान कोरोना चे अतिशय मोठे संकट आपल्या देशापुढे उभे ठाकलेले असल्याने जनतेने शासन व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करीत 14 एप्रिल पर्यंत घरातच थांबून आपल्या कुटुंबाचे,आपल्या गावाचे,आपल्या जिल्ह्याचे,आपल्या राज्याचे व आपल्या देशाचे रक्षण करावे अशी आग्रही विनंती मा आमदार शिरीषदादा चौधरींनी केली आहे.प्रसंगी गटनेते बबली पाठक, धनु भाऊ महाजन, बाळासाहेब योगीराज संदानशिव, किरण गोसावी, किरण बागुल, पंकज चौधरी, अबू महाजन व कार्यकर्ते उपस्थित होते