जनता कर्फ्यू शांततेत पार पडल्यानंतर वाद चिघळला
रावेर (प्रतिनिधी )शहरातील शिवाजी चौकात दोन गटांनी तुफान दगडफेक केली . आज देशभरात जनता कर्फ्यू अमलात असतांना घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव घेवून प्रसंगावधानाने परिस्थिती आटोक्यात आणली
शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात आज जनता कर्फ्यू लागू होता जिल्हातून या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आज रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रावेर शहरातील शिवाजी चौकात दोन गटांनी दगडफेक केली. दगडफेकमुळे प्रचंड प्रमाणावर खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे तत्काळ पथकासह घटनस्थळी दाखल झाले. आता घटनास्थळी पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान काही प्रत्यक्ष दर्शींनी दिलेल्या माहिती नुसार हिंदू मुस्लिम चिथावणीतून ही घटना घडली असावी राजकीय द्वेषातून एका जमावाने जाणीवपूर्वक हिंदू बहुल वस्तीतीत जाळपोळ करण्यात आली आहे. वाहनांनाही आग लावली आहे. असे समसते. कोरोनाच्या साथी मुळे प्रार्थना स्थळामधील गर्दी बद्दल प्रतिक्रिया व्यक्त होण्याचा संदर्भ या वादाला असावी असेही सांगितले जात आहे. याबाबत पोलीस माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहे.