जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथे महिलेचा विनयभंग करुन आरोपी कडून मारहाण झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. पीडित महिला आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घराच्या पाठीमागच्या अंगणात हात पाय धुत असतांना आरोपींने जवळ जाऊन दोनशे रुपये घे असे म्हणत. तीच्याशी झोबाझोभी केली. महिलेने आरडाओरड केल्यावर तीच्या वृध्द मावशीसह काही ग्रामस्थांनी तीला आरोपींच्या तावडीतून सोडवले या झटापटीत आरोपींने पीडितीसह मावशीला ही जबर मारहाण केली. या वादात ग्रामस्थांनी भाडण सोडवल्या नंतर सायकाळी पून्हा दारुपीऊन आरोपी व त्याच्या भावाने पीडीतीला व तीच्या कुटुंबाला लाठ्या काठ्यानी मारहाणीचा प्रयत्न केला. तीच्या कुटुंबाने केलेल्या प्रतिकारात आरोपी प्रमोद घुगे जखमी झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारी वरुन एमआयडीसी पोलीसात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तसेच
या प्रकरणी आरोपी विरोध्दात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा नुसारही अँट्रिसीटी अँक्ट प्रमाणे गुन्हा नोदवा असी मागणी आदिवासी एकता परिषदचे राज्य संपर्क प्रमुख सुनील गायकवाड,व जिल्हाध्यक्ष करण सोनवणे यांनी केली आहे.