बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी शकील पिरजादे याला अटक
जळगाव (प्रतिनिधी) – नूतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या आढाव्यानंतर पहिलीच धडक कारवाई जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनने केली आहे. मार्चमध्ये दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी शकील पिरजादे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मेहरूण परिसरातील पिरजादे वाडा येथील महिलेने १२ मार्च रोजी फिर्याद दिली होती. महिलेला सासरची मंडळी त्रास देत असल्यामुळे ती पतीसह दत्तनगर येथे राहत आहे. ६ मार्च रोजी महिला घरात एकटी रस्त्यांना शकील पिरजादे याने घरात घुसून महिलेवर अत्त्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. नूतन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हांचा आढावा घेतला होता. त्यानुसार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना केल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित शकील पिरजादे हा नशिराबाद येथे येत असल्याची माहिती पोलीस नाईक इम्रान सैयद यांना मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला अटक केली. अटक करण्यासाठी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली,उपनिरीक्षक विशाल सोनवणे, गोविंदा पाटील, संदीप पाटील, अश्यांनी त्याला अटक केली आहे.