पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यात पावसाने जोरदार असे थैमान घातले असून सर्व ग्रामीण भागात कधी नव्हे असा पाऊस बघायला मिळत आहे नवीन नाल्यांना न भुतो न भविष्यती असा पुर बघावयास मिळत आहे अशा परिस्थितीत अवकाळी व पर्जन्यवृष्टी मूळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे तर शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक पूर्णतः नेस्तनाबूत झालेले आहे व कापूस पीक शेवटच्या धोक्याची-घंटा मोजत असून कापूस ज्वारी मका लिंबू पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे
पावसाने कापसाची बोंडे झाडावरच काळी पडून पूर्णपणे कुजल्याने कापूस पीक हातातून गेले आहे या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे पूर्णतः कंबरडे मोडले गेलेले आहे अतिवृष्टी अवकाळी पावसाने जवळ जवळ 97 मिलिमीटर एवढा आकडा गाठलेला असून शेती व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे शेतकऱ्यांचे नगदी व रोखीचे पीक मानले जाणारे कापूस पीक लाल व पिवळी पडून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे या अस्मानी संकटाने शेतकरी निराश आणि हतबल झालेला दिसत आहे
तालुक्यात स्थानिक प्रशासनाला पंचनाम्याचे आदेश देऊन ालुक्यातील शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करुन एकरी 50 000 हजार रुपये एवढे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी संघटनेने मागणी केली आहे
तहसीलदार श्री अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष पाटील प्रवक्ते भिकनराव पाटील प्रहार संघटनेचे महेश मोरे छावा संघटनेचे विजय पाटील नगरसेवक पीजी पाटील प्रवीण पाटील सचिन पाटील राहुल पाटील छोटू पाटील ालुक्यातील शेतकरी उपस्थित होते