नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. सरकारकडून गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोना झाल्याचे उघड झाले. असे असतानाही ती अनेक समारंभांमध्ये सहभागी झाली. तिचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. यानंतर कनिका कपूरविरोधात लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाचे 50 नवीन प्रकरण समोर आले आहे. यानंतर शुक्रवारी संध्याकाळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 250 वर पोहोचली आहे. शनिवारी सकाळपर्यंत ही संख्या 256 झाली आहे. तर संक्रमितांच्या संपर्कात येणारे 6,700 पेक्षा जास्त लोकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. मंत्रालयाने सांगितले की, देशात कोरोना व्हायरसने संक्रमितांमध्ये 32 विदेशी आहेत. यामध्ये 17 इटालियन, दतीन फिलीपनचे, दोन ब्रिटेन आणि प्रत्येकी एक कॅनडा, इंडोनेशिया आणि सिंगापूरचा रहिवासी आहे. यामध्ये आतापर्यंत दिल्ली, कर्नाटक, पंजाब आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.