पुणे (वृत्तसंस्था) – पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी गेला आहे. 46 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेचा आजच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसापुर्वी एका 52 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा पुण्यात मृत्यू झाला होता. दरम्यान, कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आजही राज्यात 81 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 416 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 20 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 416 झाली आहे. ही संख्या 338 वर होती. मात्र आज सायंकाळ पर्यंत 81 रुग्णांची वाढ झाली आहे.