मुंबई (वृत्तसंस्था) – करोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार निधीतून दीड कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, इन्फ्युझन पंप, ऑक्सिजन सिलेंडर, पल्स ऑक्सीमीटर, पोर्टेबल एक्स- रे मशीन, फॉगिंग मशीन तसेच डिस्पोजेबल 02 मास्क, एन 95 मास्क, पीपीई किट, हॅण्ड सॅनिटायझर, ट्रीपल लेअर मास्क आणि व्हीटीएम किट्स पॅक आदी उपकरणे व साहित्याची गरज भासत आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नांदापूरकर आदींशी चर्चा केली असता हे साहित्य कमी पडत असल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे तातडीने खासदार निधीतून दीड कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.