अमळनेर (प्रतिनिधी) – येथील सोळा वर्षीय दर्शन देसडा नामक तरुणाचा गच्चीवरून पायघसरून खाली पडल्याने मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की , सुरेश उत्तमचंद टेस, रा मांजरोद, ता शिरपुर ह.मु जय योगेश्वर कॉलेजच्या मागे कुटुबासोबत मुलांच्या शिक्षणासाठी योगेश्वर कॉलेज अमळनेरच्या मागे भाड्याच्या घरात राहत आहे.त्यांच्या सोबत पुतण्या दर्शन अशोक देसडा वय 16 वर्षे रा मांजरोद ता शिरपुर ह.मु योगेश्वर कॉलनी अमळनेर शिक्षणा निमित्त राहत होतो. दि.01/04/2020 रोजी सायंकाळी 05.00 वाजेच्या सुमारास पुतण्या दर्शन अशोक देसडा भाड्याच्या राहते घराच्या वर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या साफ करत असतांना याचा अचनाक तोल जावुन पाय घसरला व तो गच्चीवरुन खाली पडला, त्यात त्याला डोक्याला मार लागल्याने त्याला उपचाराकामी डाँ अनिल शिंदे यांचे दवाखान्यात दाखल केले व त्याचेवर उपचार सुरु असतांना आज दि. ०२/०४/२०२० सकाळी ०५.०० वाजेच्या सुमारास त्यास डाँक्टर परेश पाटील यांनी तपासुन मयत घोषीत केले . पुढील तपास पोना सुनील हटकर करीत आहे. या गोष्टीची वार्ता शहरात पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.