वडजी/भडगांव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय व इंग्लिश मेडिअम स्कूल वडजी येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन कर्मवीर तात्यासाहेबांच्या १९ व्या पुण्यस्मरण सप्ताहाचा प्रारंभ विद्येचे अराध्य दैवत माता सरस्वती,संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,दिवंगत संचालिका मातोश्री आजीसो.कमलताई हरी पाटील ज्यांची आज जयंती,दिवंगत संचालक दादासो.युवराज हरी पाटील,दिवंगत संचालक अण्णासो.अशोक हरी पाटील,दिवंगत संचालिका वात्सल्यसिंधु ताईसो.साधनाताई प्रतापराव पाटील यांचे प्रतिमा पूजन, माल्यार्पण अर्पण,दीपप्रज्वलन,श्रीफळ वाढऊन विनम्र अभिवादनाने करण्यात आले.सप्ताह निमित्त आजपासून सुरू होणाऱ्या विविध ऑनलाईन विविध क्षैक्षणिक गुणदर्शन आंतरशालेय स्पर्धा प्रारंभ सहशालेय समितीच्या उपस्थितित करण्यात आला.सप्ताहअंतर्गत नाविन्यपूर्ण ऑनलाईन स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीं सहभागी होऊन आपले कौशल्य दाखवावे असे आवाहन मुख्याध्यापक डी.डी.पाटील,जेष्ठ शिक्षक बी.वाय.पाटील,वरिष्ठ शिक्षक एस.जे.पाटील,सप्ताह समिती प्रमुख जे.एच.पवार व प्राचार्य के.ए.मोरे सह सर्व समिती प्रमुख तसेच सदस्यांनी केले आहे.सदर शैक्षणिक पुण्यस्मरण सप्ताहास संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील,सचिव डॉ.सौ.पूनमताई प्रशांतराव पाटील,महाराष्ट्र राज्य मंत्रालय सचिव दादासो.प्रशांतराव पाटील यांचे मार्गदार्शन लाभत आहे.विद्यालयात सप्ताह शुभारंभ प्रसंगी मुख्याद्यापक,प्राचार्य सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर सहकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.