जळगाव(प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाला राज्य शासनाने घोषित केलेले आरक्षण लागू होण्याबाबत सोमवारी भाजपातर्फे जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी भाजपा जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत भाजपाचे मराठा समाजातील नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर महिन्यात दिलेली स्थगिती उठवून मराठा समाजाला न्याय द्यावा. तसेच आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, असे न झाल्यास आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
याप्रसंगी नगरसेवक जितेंद्र मराठे, अँड. दिलीप पोकळे, कुलभुषण पाटील, राजु मराठे, ज्योतीताई चव्हाण, प्रा.सचिन पाटील, नवनाथ दांरकुडे, गायत्री शिंदे, विनोद मराठे, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.