वनविभागाच्या ताब्यातील दोन संशयित फरार

मुक्ताईनगर प्रतिनिधी
वडोदा वनक्षेत्रात मांडूळ सापाची तस्करी पाच जणांनी केल्याची घटना दि.14 रोजी घडली होती दरम्यान या प्रकरणी 5 जणांना वन विभागाने ताब्यात घेतले होते तर दोन संशयित फरार झाले होते.या पाच जणांना मुक्ताईनगर न्यायालय प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयित 5 जणांना दिनांक 17 सप्टेंबर पर्यंत तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.तसेच जप्त करण्यात आलेला मांडूळ जातीच्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश देण्यात आले. तर गुन्ह्यात वापरण्यात आलेले तीन मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
पथकाने मांडूळ सापाची खरेदी विक्री होत असल्याची गुप्त बातमी पोलीसाना मिळाली होती.त्याना सापळा रचून 5 जणांना पकडे तर 2 जण फरार झाले.अटक केलेल्याना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याना पुढील तपासासाठी मुद्देमालसह वडोदावनक्षेत्र विभाग जळगाव यांच्याकडे पुढील कार्यासाठी ताब्यात देण्यात आले. सदर संशयित आरोपीची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला आहे.
दि,15 रोजी आरोपी प्रदीप धनराज चव्हाण रा, टाकळी , प्रवीण अमरदीप खिलारे रा, अजिसपुर ता, जि, बुलढाणा , भागवत सुनील डुकरे राहणार अजिसपुर ता, जि,बुलढाणा, पंकज रतन चव्हाण रा, मोरझीरा ता, मुक्ताईनगर , अरविंद माणिकराव कांडेलकर रा को-हाळा ता मुक्ताईनगर यांना मे, न्यायालय प्रथम वर्ग दंडाधिकारी मुक्ताईनगर यांच्यासमोर हजर केले असता मे, न्यायालयाने आरोपीची दिनांक 17 पर्यंत तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली तसेच जप्त करण्यात आलेला मांडूळ सापाला या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश देण्यात आले.
सदर कार्यवाही श्री विवेक विहोसिंग उपवन संरक्षक जळगाव वनविभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली चिमाजी कांमडेसहा वनरक्षक (मृ स व) कॅम्प जळगाव, राजेन्द्र राणे वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन भुसावल स्थित जळगाव अमोल , चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी वडोदा श्री दिगंबर गोपाळ पांचपाडे ,वनपाल चारठाणा ज्ञानोबा धुळगडे वनरक्षक वडोदा पूर्व श्रीरामअसुरे वनरक्षक चारठाणा श्री विजय अहिरे वनरक्षक राजुरा यांच्या मदतीने कार्यवाही करण्यात आली. सदर वन गुन्हा प्रकरणाचा पुढील तपास श्री चिमाजी करीत आहे.







