भुसावळ (प्रतिनिधी) गुन्हेगारी कारवायांमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या भुसावळात पुन्हा रविवारी रात्री 19 वर्षीय युवकाच्या छातीवर वार करून खून करण्यात आल्याने भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. अल्तमश शेख रशीद (19, हॉटेल बाबला परीसर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
खडका रोडवरील एका पुलाजवळ रविवारी रात्रीच्या 10.30 वाजेच्या सुमारास मयताचा मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हा खून नेमका कुणी वा कोणत्या उद्देशातून केला? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या पोटावर आरोपींनी चार ते पाच वार करण्यात आल्याचे समजते तर मृतदेह शहरातील जामनेर रोडवरील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आणल्यानंतर डॉ.राजेश मानवतकर यांनी संबंधित मयत झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. खून झाल्याच्या वृत्ताला पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी दुजोरा देत त्याच्या छातीवर वार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.