जळगाव शनिपेठ पोलीसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील चौगुले प्लॉट भागात भर रस्त्यावर भलीमोठी तलवार घेवून फिरणा-या तरुणास शनीपेठ पोलिसांनी अटक केली आहे. मिलींद शशिकांत दलाल उर्फ बबलु (३२) रा.शनिपेठ चौगुले प्लॉट असे तलवार बाळगणा-या अटकेतील तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या कब्जात 63 से.मी. लांबीची तलवार बेकायदा बाळगून परिसरात दहशत माजवत होता.
त्याला पो.नि. विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. दिनेशसिंग पाटील, हकीम शेख, पो.कॉ. अभिजीत सैंदाने, राहुल पाटील, मिलींद घेटे, संदीप माने, मुकुंद गंगावणे अनिल कांबळे यांच्या पथकाने घटनास्थळी जावून ताब्यात घेत अटक केली.
या प्रकरणी पो.कॉ. अनिल मरीबा कांबळे यांच्या फिर्यादीनुसार शनिपेठ पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व जिल्हाधिकारी जळगांव यांचे कडील मुं.पो.अॅक्ट कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली.