सोलापुरात नातवाला पोहायला शिकवताना एका वृद्धाचा विहिरीत पडून दुर्देवी अंत झाला.

या वृद्धाला पोहता येत असूनही त्यांची पँट अडकल्याने ते बुडाले. देवदास नामदेव डोलारे अंस या 60 वर्षीय वृद्धाचं नाव आहे. देवदास यांच्या मृत्यूने संपूर्ण डोलारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे देवदास नामदेव डोलारे हे नातवासोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते. नातवा सोबत पोहोण्यासाठी गेले असता पँट काढत असताना त्यांच्या पायात पँट अडकली. त्यमुळे त्यांना पोहायाला येत असूनही त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सोलापूर-बार्शी रोडजवळील अजित देशपांडे यांच्या शेतातील बांधिव विहिरीमध्ये ही घटना घडली. देवीदास हे नातू प्रवीणला पोहायला शिकविण्यासाठी घेऊन गेले होते. देविदास हे कपडे काढत असताना त्यांची पँट पायात अडकली आणि त्यांचा तोल जाऊन ते विहिरीमध्ये गेला विहिरीला पाणी भरपूर असल्यामुळे आणि दोन्ही पाय पँटमध्ये अडकल्यामुळे त्यांना पाय हलवता न आल्यामुळे डोलारे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विहीरीतील मृतदेह शोधण्यासाठी वॉटर प्रुफ कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली आहे. त्यानंतर देवदास नामदेव डोलारे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याक आला.







