जळगाव प्रतिनिधी – शहरातील एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी पार्क भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन पुरुषांसह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांना मिळालेले गुप्त माहितीनुसार जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या लक्ष्मी पार्क भागात एका 45 वर्षीय महिला तिच्या राहत्या घरात कुंटणखाना चालवत असल्याची माहिती गुप्तपणे मिळाली होती. याप्रकरणी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहन यांनी कारवाई करत आज अचानक पर्यंत धाड टाकून दोन पुरुष व दोन महिलांना अटक केली आहे.
या कारवाईत ग्राहक अधीर अजित पटेल वय 36 विश्वकर्मा नगर रामेश्वर कॉलनी मेहरुन जवळ विजय कमलाकर सपकाळे (वय 25 वर्षे) रा वाल्मिक नगर जळगाव यांच्यासह 2 महिला आढळून आल्या या चौघांवरती एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक महिला 45 वर्षे असून ती कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. तिची चौकशी केली असता दहा हजार रुपये रोख व तीन कंडोम चे पाकिट आढळून आले.
यांनी केली कारवाई
सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन , पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांचे सह सहायक पोलीस निरीक्षक निता कायटे, स.फौ.विनयकुमार देसले, रमेश जाधव, पोहेकॉ विजय पाटील, रामकुष्ण पाटील, नरेंद्र वारुळे, महीला पोहेकॉ ललीता सोनवणे, मिनल साकळीकर, छाया मराठे, सुनिल दामोदरे, महेश पाटील, अशोक फुसे, महेश महाजन, तसेच दोन महिला पंच व पुरुष पंच यांनी छापा टाकला.