जळगाव (प्रतिनिधी) शहरा लागत असलेल्या खेडी बु.येथे राहात्या घरात रात्री छताला दोरी बाधुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. निकेश राजपूत असे मयत तरुणांचे नाव असुन दोन महिन्यापूर्वी त्याचे लग्न झाले आहे.

याबाबत अधिक माहिती असी की जळगाव तालुक्यातील कुसुबा दत्तमंदिर जवळ येथील रहिवासी निकेश तिरसिंग राजपूत (वय 27) ह.मु.खेडी बु.येथे भाड्याची खोली करुन पत्नी मीना सह राहात होता. दि.12 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास निकेश घरी आल्यानंतर थोडा टेन्शन मध्ये होता. कोणाला काही न सागता मागच्या खोलीत जाऊन आतुन कडी लाऊन रात्री 1 वाजेच्या पूर्वी घरातील छताच्या कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी मीना यांनी शेजारी व नातेवाईक यांना आरडाओरडा करुन बोलवले निकेश ला रात्री दिड वाजेच्या सुमारास देवकर काँलेज मधील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी निकेशला मृत्यू घोषित केले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. प्राथमिक पुढील तपास पो.ना.महेंद्र गायकवाड, पो.काँ. शांताराम पाटील हे करीत आहे.
दोन महिन्यापूर्वी झाले होते लग्न
निकेश तिरसिंग राजपूत (पाटील) याच्या मामाने लाँकडाऊन असल्यामुळे कमी नातेवाईकांच्या उपस्थित जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील देवळात खेडी बु. येथिल कु.मीना सोबत लग्न लाऊन दिले होते. निकेशच्या पच्छात आई – वडील तीन भाऊ असा परिवार आहे.







