जळगाव [प्रतिनीधी] – जळगाव येथील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाचे उपशिक्षक योगेश भालेराव यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात आले.
राजनंदिनी बहुउउद्देशीय संस्था जळगाव व महाराष्ट्र कुणबी मराठा वधुवर ग्रुप गौरी उद्योग समुह वावडदा ता जि जळगाव तर्फे दरवर्षी देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त करण्यात येतो.

योगेश भालेराव नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तप्तर असतात.वेळोवेळी पालकांचे मार्गदर्शन करतात.विवीध उपक्रम स्पर्धा राबवतात व नेहमी सहकार्याची भावना जोपासतात त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष एस.डी.वाघ यांच्यातर्फे त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या पुरस्काराबद्दल गौरी उद्योग समूहाचे संचालक सुमित पाटील , शाळेच्या मुख्या.रेखा पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.







