जळगाव ( प्रतिनिधी) – नसलेल्या बढतीसह बदलीचा गाजावाजा करणारे यावलचे पो.नि. अरूण धनवडे यांचा पत्ता त्यांच्याच कर्मांनी कट होऊन बहुचर्चित जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदावर आता चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांची वर्णी लागली आहे. लवकरच ते या नव्या पदाची सुत्रे हाती घेतील.
पो. नि. विनायक लोकरे यांनी यापुर्वी त्यांच्या सेवेच्या सुरूवातीच्या काळात गडचिरोलीसह नाशिक आयुक्तालयासह त्यांनी आधी एटीएसचा प्रभारी चार्ज म्हणून जळगाव, धुळे व नंदुरबार येथेही सेवा बजावलेली आहे. सध्या ते चोपडा शहर पोलिस ठाण्यात गेल्या 14 महिन्यांपासून पोलिस निरीक्षक होते. आता जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कारभाराला ते नव्याने शिस्त लावतील अशी आशा आहे.