मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील करोना बाधितांचा आकडा सोमवारी आणखी वाढला आहे. राज्यात आणखी १२ करोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. यात सर्वाधिक पुण्यातील आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत तीन, नागपूरमधील दोन आणि कोल्हापूर व नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउ घोषित करण्यात आले आहे. तसंच देशात आणि राज्यात करोनाग्रस्तांचा आकडाही वाढत आहे. या पार्शवभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची आणि घरात बसण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच या परिस्थिती खासगी वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांनी सेवा देणं बंद केल्याच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. याव्यतिरिक्त आरोग्य मंत्र्यांनीदेखील अशा परिस्थितीत खासगी डॉक्टरांनी असंवेदनशीलता दाखवू नये असे म्हटले होतं, त्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लॉकडाउन दरम्यान कोणतीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये, असे आदेश त्यांनी दिले आहेत, असं केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.