नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरस जगभरासाठी एक मोठी समस्या बनली आहे. चीनच्या वुहान शहरापासून झालेला हा प्रसार थांबायचे नाव घेत नाहीतये. आतापर्यंत जगभरातील अनेक देश या व्हायरसने ग्रस्त झाले आहेत. भारतामध्येही हा व्हायरस झापाट्याने वाढत आहे. ताज्या आकडेवारीनुसार इटलीमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सुक्रवारी इटलीमध्ये कोरोनामुळे 627 लोकांचा मृत्यू झाला. तर कोरोना व्हायरसचे 5986 नवीन प्रकरण समोर आले.
शुक्रवारचे आकडे मिळून इटलीमध्ये आतापर्यंत 4032 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 47,021 झाली आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. िटलीमध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांमधील 2,655 लोकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. इटली आणि चीनच्या आकड्यांनुसार वृद्धांना या व्हायरसचा सर्वात जास्त धोका आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाण इटलीने आता चीनला मागे सोडले आहे. इटलीच्या आरोग्य संघटनांनी आपल्या अभ्यासात सांगितले की, यामध्ये जास्तीत जास्त वृद्धांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये झालेल्या जास्तीत जास्त रुग्णांचे वय 80 च्या जवळपास आहे. तर सर्वात जास्त संक्रमित होणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे वय हे 63 आहे.