नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीमधील निजामुद्दीन मर्कझचे प्रमुख मौलाना साद सध्या फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. मोहम्मद साद यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके उत्तर प्रदेशात पाठवण्यात आली आहेत. त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. मोहम्मद साद यांच्या नातेवाईकांच्या घराचीही छाडाछडती घेण्यात आली आहे. दरम्यान क्राइम ब्रांचचे दुसरे पथक जिथे मोहम्मद साद जिथे लपले असण्याची शक्यता आहे त्या मशिद आणि इतर ठिकाणी शोध घेत आहेत. दिल्ली पोलिसांनी मोबाइलच्या सहाय्यानेही मोहम्मद साद यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. पण एफआयआर दाखल केल्यापासून मोहम्मद साद यांनी आपला मोबाइल बंद ठेवला आहे. त्याची एक ऑडिओ क्लिप नुकतीच समोर आली होती ज्यामध्ये त्याने आपण विलगीकरणात असल्याचा दावा केला होता. क्राइम ब्रांचची टेक्निकल टीम ऑडिओ क्लिपच्या सहाय्याने मोहम्मद साद यांची माहिती मिळते का यासाठी प्रयत्न करत आहेत. दिल्ली पोलिसांनी २४ मार्चच्या आधी मर्कझमधून बाहेर पडलेल्या सर्व भारतीयांची एक यादी तयार करायला सांगितली आहे.