नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आज दहा लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. तर मृतांचीं संख्या ५० हजाराच्या घरात आहे. त्यामुळे जगभरात विशेषतः युरोप आणि अमेरिका खंडात भीतीचे वातावरण आहे. बुधवार अखेर जगातील कोरोनाबाधोतांची संख्या नऊ लाख ३५ हजार ५७१ एवढी होती. तर मृतांची संख्या ४७ हजार २०६ होती. सर्वाधिक मृत्यू इटलीत झाले असून तेथे मृतांच्या संख्येने १३ हजारच टप्पा ओलांडला आहे. केवळ मंगळवारी तेथे तेथे ७२७ जण मरण पावले. अमेरिकेत काळ सुमारे झक हजार जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तर बाधितांची संख्या दोन लाखाच्या घरात आहे. जागतिक अर्थकेंद्र म्हणून ओळखले जाणारे न्यूयॉर्क शहराला सर्वाधिक फटका बसला आहे. कोविद १९ ने बाधित लोकांची संख्या १० लाख झालेली आपण पाहू. तर मृतांची संख्या ५० हजार झालेली असेल. आपणही साथ सुरु झाल्यांनतर चौथ्या महिन्यात प्रवेश करत आहोत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे मी भयभीत आहे,असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.







