फैजपूर ( प्रतिनिधी)- रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील 196 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 172 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालात फैजपूर येथील एक पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्याने खळबळ उडाली आहे.


लवकरच आरोग्य विभागाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी यांना उपचारासाठी हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या अधिका-यांच्या संपर्कात आलेले लोकांना पण काँरेन टाईम करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 595 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आता पोलीस आणि आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारीसुद्धा कोरोनाचे रुग्ण ठरत असल्याने या परिस्थितीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र लोकंडाऊनच्या सुरवातीपासून केल्या जात असलेल्या कामगिरीमुळे पोलीस खात्याची व आरोग्य खात्याची प्रशंसा होते आहे. सध्याच्या अतंत्य कठीण परिसथितीत या दोन खात्यांवर सर्वांचीच मदार असल्याने त्यांच्यावरच कामाचा प्रचंड ताण आहे. या दोन्ही विभागातील कर्मचारी या पुढच्या काळात कोरोनाचे रुग्ण ठरू नयेत म्हणून अत्यंत्य दर्जेदार उपाययोजना कराव्या लागणार आहे. या दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांसाठी सरकारी धोरण लवचिक करून त्या त्या भागातील त्यांच्या गरजांनुसार सुरक्षेच्या उपायांसाठी तात्काळ पावले उचलली गेली पाहिजेत अशी अपेक्षा या दोनीही विभागातील कर्मचारी वक्त्य करीत आहे.







