कराची (वृत्तसंस्था) – पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्स्चेंजवर आज (सोमवार) दहशतवादी हल्ला करण्यात आला. (Karachi stock exchange attack) यावेळी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. (Terrorist attack) मात्र, आता या हल्ल्यासंबंधी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एकूण ९ जण ठार झाले आहेत. सुरुवातीला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ४ सुरक्षा रक्षक ठार झाले होते. तर ज्या चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता. त्या चारही दहशतवाद्यांना पाकिस्तानी पोलिसांनी ठार केलं आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार अज्ञात बंदूकधार्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला. लोकांनी गोळ्यांचा आवाजही ऐकला. घटनास्थळावरून लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी येथे सुरुवातीला ग्रेनेड हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. कराची हे शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतं. हे शहर पाकिस्तानची व्यापारी राजधानी आहे.








