नवी दिली (वृत्तसंस्था) – जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या अद्याप देखील झपाट्याने वाढतानाच दिसत आहे. भारतामध्ये देखील कोरोनाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून ताज्या आकडेवारीनुसार भारतामध्ये आतापर्यंत ३१,३३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
अशातच आज कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागणाऱ्यांच्या संख्येने १ हजाराचा टप्पा ओलांडला असून भारतामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १००७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील असून एकट्या महाराष्ट्रामध्ये ४०० जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागलेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या तक्त्यामध्ये गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असून येथे १८१ जणांना कोरोनामुळे मृत्यू पत्करावा लागलाय.
देशभरामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ७६९५ रुग्णांनी कोरोनावर मत केली आहे. बरे झालेलेवमृत्युमुखी पडलेले रुग्ण वगळता देशामध्ये सध्या कोरोनाचे २२६२९ रुग्ण उपचार घेत आहेत.








