पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोलाणे येथील योगेश सुभाष पाटील हा तरुण दुचाकीने मुकटी ते भोलाणे जात असतांना त्यास पलिकडून भोलाणे ते धुळे जाणा-या दुचाकीने जोरदार धडक दिली. काल रात्री 8.30 वाजता झालेल्या या अपघातात योगेश पाटील हा तरुण जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी एमएच 18 एक्स 6474 या अज्ञात वाहनचालकाविरुद्ध जगदीश पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आज सकाळी पारोळा पोलिसात रितसर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हे.कॉ.इकबाल शेख करत आहेत.