औरंगाबाद (वृत्तसंस्था) – नमाज पठण करण्यासाठी प्रार्थना स्थळी जमा झालेल्या लोकांना समजावण्यासाठी गेलेल्या बिडकीन पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याची घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन येथे घडली आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी व एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींवर बिडकीन येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. या प्रकरणी बिडकीन पोलिसांनी 15 लोकांना ताब्यात घेतले आहे.