पालघर (वृत्तसंस्था) – जिल्ह्यात वसई -विरार महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांची वाढ होत असतांना ग्रामीण भागात मात्र, सारीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 27 एप्रिलला संध्याकाळपर्यंत सारीच्या रूग्णांची संख्या 297 इतकी झाली असुन, ग्रामीण भागाला सारी आजाराने घट्ट विळखा घातला आहे. जिल्ह्यात पालघर, डहाणू, जव्हार आणि मोखाडा तालुक्यासह वसई – विरार महापालिका क्षेत्रात सारीचे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. सारीला रोखण्यासाठी आता प्रत्येक तालुका स्तरावर फिवर क्लिनीक स्थापन करण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तीची सर्वेक्षणासाठी आरोग्य विभागाने मदत घेतली आहे.