मुंबई – अंमली पदार्थांची चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कोणत्याच कलाकाराला काम करण्याची परवानगी देऊ नये, अशी विनंती अभिनेत्री कंगणा राणावतने केंद्र सरकारकडे केली आहे.
सीबीआयकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. सीबीआयने रियाच्या मोबाइल फोनमधून तिने डिलिट केलेले व्हॉट्स अॅप चॅट पुन्हा प्राप्त केले आहेत. यात अंमली पदार्थांबाबतही काही संवाद आहेत. यावर कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली.बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात. या सर्व कलाकारांची चौकशी व्हायला हवी, असं कंगणा म्हणाली आहे.
दरम्यान, ज्याप्रमाणे करोना चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कुठलाही कलाकार शूटिंगला जाऊ शकत नाही. अगदी त्याच प्रमाणे अंमली पदार्थांची चाचणी निगेटिव्ह आल्याशिवाय कोणत्याच कलाकाराला काम करण्याची परवानगी मिळता कामा नये. यासाठी सरकारने नवे कायदे तयार करावे, असंही कंगणाने म्हटलं आहे.








