धानो-यात गुणवंतांचा सत्कार !
प्रतिनिधी धानोरा
दहावी,बारावीत भरघोस गुण मिळाले म्हणजे यशाची शेवट झाले असे नाही,खरी आयुष्याची सुरुवात ही येथूनच होत असते,यशाची उंची गाठण्यासाठी सकारात्मक अभ्यास अतिशय गरजेचा असतो,तेव्हा कुठे यशाचे उंचशिखर गाठता येते यासाठी प्रत्येक विद्यार्थांनी आपली सकारात्मक बाबींवर आपण लक्ष केंद्रित केले पाहीजे असे प्रतिपादन अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे यांनी गुणवंतांचा सत्कारावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


येथिल डॉ बी आर आंबेडकर मोफत अभ्यासिका व पत्रकार संघ यांच्या संयुक्तपणे दहावी,बारावीतील गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.यावेळी गुणवंतासमवेत पालकांनाही गौरविण्यात आले.यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे,पंचायत समिती सदस्या कल्पना पाटील,माजी उपसभापती माणिकचंद महाजन,मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील,देवेंद्र चौधरी,विनोद गुजर,गजानन पाटील,राजेंद्र चौधरी,रावसाहेब पाटील,संदिप पवार,उमेश महाजन,सलिम शेख,सुनिल कोळी,लोटन सोनवणे,प्रविण ठाकूर आदी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कृतिका चौधरी,दर्शना गुजर यांनी आपले यशाचे श्रेय आई-वडील यांना देत शिक्षकांनी योग्य मार्ग दाखवल्यामुळे आम्ही जास्त यश मिळवू शकले असे सांगितले.माणिकचंद महाजन यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले.तसेच सपोनी तांदळे यांनी विद्यार्थ्यांनी पोलिस सेवेत येऊन देशाची सेवा करावी.पोलिस खात्याच्या उच्चथ्थ पदावर जावे अशी सदिच्छा दिली.सुत्रसंचलन क्रिडाशिक्षक देविदास महाजन,आभार प्रशांत सोनवणे यांनी केले.
या गुणवंतांचा झाला सत्कार
बारावीमधुन जानवी किरण चौधरी,काजल कोळी,जागृती साळूंखे यांचा तर दहावीमधुन कृतिका चौधरी,दर्शना गुजर,देवाशिष चांदसरे,यश पाटील यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
नकारत्मकता हा सर्वात मोठा शत्रू – प्रशांत सोनवणे
विद्यार्थी दशेत प्रत्येक विद्यार्थींनी,विद्यार्थी यांनी आपल्या पालकांसोबत कौंटूबिक वातावरणात चर्चा करणे आवश्यक आहे,आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू हा नकारत्मकता असुन याला प्रत्येक बाबींमधुन हद्दपार करणे गरजेचे असुन नियमित सकारात्मक डोंळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा,आता शैक्षणिक धोरणातही बदल झाला असुन तो समोर ठेवून आपल्या करीअरीची दिशा ठरवावी असे गुणवंतांना मार्गदर्शन करतांना अभ्यासिकाचे संचालक प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.







