नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ऑस्ट्रेलियामध्ये २०२० साली होणाऱ्या T20 World Cup 2020 स्पर्धेवर करोनाचे सावट आहे. करोनाच्या तडाख्यामुळे टी २० विश्वचषक स्पर्धा २०२० लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. ICC च्या क्रिकेट समितीची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात टी २० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरदेखील चर्चा झाली. त्यानुसार टी २० विश्वचषक हा नियोजित ओक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत खेळवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी (२८ मे) पुन्हा एकदा या संबंधी चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. त्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ICC प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.







