जळगाव (प्रतिनिधी) राज्यात सर्वत्र पालक कोरोना साथरोगा च्या तडाख्यात हैराण असताना महाविद्यालये नवीन प्रवेश देताना मनमानी पद्धतीने ट्युशन फी ची मागणी करून पालक आणि विध्यार्थ्यांना लुबाडत आहेत अशा महाविद्यालयांवर कारवाईची मागणी जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिव अँड. कुणाल पवार आणि फार्मसी कौन्सिल चे अध्यक्ष भूषण भदाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिव अँड कुणाल पवार आणि फार्मसी कौन्सिल चे अध्यक्ष भूषण भदाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे शेतमजुरांपासून खाजगी नोकऱ्या करणारांसह व्यापारी आणि उद्योजकांचेही अर्थचक्र बिघडले आहे बऱ्याच ठिकाणी कामगार कपात आणि पगार कपात होतं आहे या भयानक परिस्थिती मध्येही आता महाविद्यालये नवीन प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची अक्षरशः लूट करीत आहेत पालकांचा रोष वाढून ते आंदोलनासाठी रस्त्यावर येण्याआधी राज्य सरकारने या प्रश्नात लक्ष घालण्याची गरज आहे सगळीकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल टॅब आणि रिचार्जे चा खर्च वाढलेला असताना हे नवे संकट भयानक होऊ पाहत आहे शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे या तत्वाची राज्य सरकारने बुज राखून ही अनागोंदी थांबवावी







