पाचोरा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या बदरखे गावात दि.२१ रविवार रोजी विवाहितेने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्याचे कारण स्पष्ट होत नहोते. पतीसह सासू, नणंदेने संगनमत करून विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरोधात पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती नितीन पाटील यास अटक करण्यात आलेली आहे.
तळई ता. एरंडोल येथील माहेर असलेल्या कविता पाटील हिचा नितीन सुभाष पाटील रा बदरखे ता. पाचोरा याच्याशी सहा वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. तिच्या पतीने आपल्या आई तसेच बहिनिंशी संगनमत करून तिचा मानसिक, शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली होती. तसेच मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून ८० हजार रुपये आणावे यासाठी ते त्रास देत होते. या छळास कंटाळून अखेर कविताने गळफास घेतला. अशी फिर्याद मृत कविता पाटील हिच्या भावाने पाचोरा पोलिसात दिली असून नितीन सुभाष पाटील पती, सुरेखा सुभाष पाटील सासू, नीलिमा दिपक पाटील (तरवाडे)नणंद, रिंकू (पूर्ण नाव माहीत नाही धरणगाव)नणंद, यांच्या वोरोधात गु.र.नं २३५/२०२० भा.द.वी. कलम ३०४ब, ३०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे सह नगरदेवळा दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करीत आहेत.