पाचोरा (प्रतिनिधी) – संपुर्ण राज्यात कोरोना विषाणूची साथ झपाटयाने पसरत असून त्यावर नियंत्रण मिळविणे व वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी म.जिल्हाधिकारी सो. जळगांव यांचे आदेशानूसार शहरातील प्रत्येक नागरीकाने चेह-यावर मास्क न लावणे सक्तीचे करण्यात आलेले असून मास्क न वापरतांना कुणीही आढळून आल्यास संबंधीताकडून रक्कम रुपये 500/- मात्र दंड म्हणून वसूल करण्यात कार्यवाही नगरपरिषदेने सुरु केलेली असून याकामी दिनांक 24/06/2020 रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी अचानक तपासणी केली असता शहरातील विविध भागातील मास्क न वापरणा-या 34 नागरीकांवर कार्यवाही करत अदमासे रक्कम रुपये 2500/- मात्र दंड वसूल आकारण्यात आला त्याच प्रमाणे संध्याकाळी 5 वाजेनंतर सुरु असलेल्या दुकाने / आस्थापना यांना देखील सक्त सुचना देण्यात आल्या सदरच्या मोहीमेत पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, अभियंता मधुकर सुर्यवंशी, हिंमांशू जैस्वाल, दत्तात्रय जाधव, विलास देवकर, सुधिर पाटील, अनील मेघराज पाटील, महेंद्र गायकवाड, भागवत पाटील, राजेंद्र वाघ, संजय जगताप, गणेश अहिरे, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, गोवींदा पारोचे, सचिन कंडारे आदी कर्मचारी यांचा समावेश होता. यापुढे मोहीम अधिक तिव्र करणार असून नागरीकांची नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.








