• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला 61 टक्क्यांवर

दिवसभरात 113 रुग्ण बरे झाले, आतापर्यंत 1576 रूग्णांची कोरोनावर मात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 24, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – दि. 24 – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांपैकी आज दिवसभरात (23 जून रोजी) 113 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आजपर्यंत 1576 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्ण वाढत असले तरी बरे होण्याचे प्रमाण 61 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनामुक्त रूग्णांचे प्रमाण वाढत असल्याने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेचेही कौतुक केले आहे.
कोरोनावर मात केलेल्या रूग्णांमध्ये तीन महिन्याच्या बालीकेपासून 92 वर्षीय आजीच्या तर समावेश आहेच. शिवाय विविध व्याधी व जुने आजार असलेल्या रूग्णांसह अनेक कोरोना योध्दांचाही समावेश आहे. जिल्ह्यात दिवसभरात आणखी 113 जण बरे झाल्याने आपापल्या घरी परतले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रूग्णांना वेळेवर आवश्यक ते उपचार तातडीने मिळावेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र झटत आहेत.
त्याचबरोबर राज्य शासनानेही बाहेरील जिल्ह्यातील डॉक्टर व परिचारिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्ती करून रूग्णांना वेळेवर उपचार व औषधी मिळत असल्याने व नागरिकही वेळेत तपासणीसाठी येत असल्याने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच रूग्णालयात रूग्णांना चहा, नाश्ता, जेवण आदि सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालय व डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजसह शहरातील गणपती हॉस्पिटल व गोल्ड सिटी, भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल हे सर्व सुविधांसह कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी अधिग्रहीत केले आहे. शिवाय नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील 33 हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत केला आहे. तसेच जिल्ह्याच्या विविध ठिकाणी 78 कोविड केअर सेंटर 36 कोविड हेल्थ सेंटर तर 24 कोविड हेल्थ हॉस्पिटल तयार करण्यात आली आहे. याठिकाणी बाधित रुग्णांवर तातडीने व वेळेवर उपचार होत असल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित 2589 रुग्णांपैकी आतापर्यंत 1576 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे दर हा 61 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
जळगाव जिल्ह्यात तालुकनिहाय आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची माहिती
जळगाव शहर- 280, जळगाव ग्रामीण- 33, भुसावळ- 234, अमळनेर- 196, चोपडा-131, पाचोरा-40, भडगाव- 82, धरणगाव- 65, यावल -73, एरंडोल- 44, जामनेर-78, रावेर-120, पारोळा- 88, चाळीसगाव- 17, मुकताईनगर -13, बोदवड -11, इतर जिल्ह्यातील- 3, जळगाव जिल्ह्यातील इतर जिल्ह्यांमधील रुग्ण – 68 याप्रमाणे एकूण 1576 रूग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी इन्सिडन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, महापालिका क्षेत्रात आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी, महसुल, पोलीस दलाचे कर्मचारी दिवसरात्र परिश्रम घेत असून त्यांना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही चांगले सहकार्य लाभत आहे. त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण कोरोनामुक्त होत आहे.
असे असले तरी नागरिकांनी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. लॉकडाऊनचे पालन करावे व घरातच सुरक्षित रहावे. अनावश्यक गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर राखावे. मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. तपासणीसाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी केले आहे.


 

 

Previous Post

अरे बापरे… ! जळगाव जिल्ह्यात आज 170 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

Next Post

पाचोरा येथे नगरपालिकेतर्फे सार्वजनीक ठिकाणी मास्‍क न वापरणा-यांवर दंडात्‍मक कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा येथे नगरपालिकेतर्फे सार्वजनीक ठिकाणी मास्‍क न वापरणा-यांवर दंडात्‍मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon