वावडदा (प्रतिनिधी) – येथे दि.23 रोजी हिवताप डेंग्यू विषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसावद मार्फत वावडदा गावातील घरोघरी भांड्यांचे तपासणी करण्यात आली व रवींद्र भाऊ कापडणे, राजेंद्र बोरसे.पञकार, सुमित भाऊ पाटील यांच्या सहकार्याने गप्पी मासे पैदास केंद्रात मासे सोडले डासोउत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.

गावातील नागरिकांना हिवताप डेंग्यू आणि साथीच्या इतर आजारांचे, आणि कोरोना आजाराविषयी नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय योजना बद्दल आरोग्य शिक्षण देण्यात आले, यावेळी जी. एल. बारी आरोग्य सहाय्यक व एस. आर. पिंजारी, उपकेंद्र जळके आरोग्य सेवक, पि एन गढरी,
आरोग्य सेवक प्रा. आ. केंद्र म्हसावद इत्यादी उपस्थित होते.









