जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण परिसरातील शेरा चौकातील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारत 11 मोबाईल, गॅस सिलिंडर व पाण्याची मोटार चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी संशयित आरोपीस अटक केली.
शेरा चौकात राहणारे इस्लाम शेख शाकीर शेख (34) पार्टीशनच्या खोलीत कुटूंबीयांसह राहतात. मिस्त्री काम करतात. त्यांच्या घराजवळ सैय्यद वकार सैय्यद सलीम अली राहतो. त्याचा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय आहे़ मोबाईल ना-दुरूस्त असल्यामुळे रविवारी रात्री इस्लाम शेख यांनी सैय्यद वकार यांना फोन करून मोबाईल दुरूस्ती करावयाचा आहे, असे सांगितले़ वकार याने त्यांना शेरा चौकात बोलविले नंतर मोबाईल पाहून सकाळी दुरूस्त करेल असे सांगितले़ सैय्यद वकार कुणाचा तरी फोन आला़ त्यांनी त्यांच्या हातात असलेली दहा मोबाईल ठेवलेली बॅग इस्लाम शेख यांना दिली व तुम्ही ही बॅग आणि तुमचा मोबाईल सकाळी दुकानावर घेवून येण्याचे सांगितले़ नंतर तो तेथून निघून गेला़.
शेख कुटूंबीय झोपलेले असताना मध्यरात्री चोरट्यांनी पार्टीशनच्या घराची फळी कापून घरात प्रवेश केला़ नंतर दुरूस्तीसाठी दिलेले दहा मोबाईलची बॅग, घरातील गॅस सिलिंडर आणि पाण्याची मोटार घेवून चोरटे पसार झाले़ सोमवारी सकाळी इस्लाम शेख यांना जाग आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा व लाकडी फळी कापलेली आढळून आली. नंतर पाहणी केली असता 61 हजार 500 रूपये किंमतीचे 11 मोबाईल, अडीच हजार रूपये किंमतीचे गॅस सिलिंडर आणि 5 हजार रूपये किंमतीची पाण्याची मोटार असा एकूण 69 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी इस्लाम शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी वसीम कदीर पटेल (रा. मास्टर कॉलनी, सुन्नी मश्जितजवळ) हा संशयास्पद फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होेती. शहरात बर्याच घरफोड्या दाखल झाल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर नीलाभ रोहन यांचे आदेशाप्रमाणे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पो कॉ इम्रान सय्यद यांनी मिळालेल्या माहितीनुसार पो नि विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंद सिंग पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, सचिन पाटील, योगेश बारी, नरेंद्र सोनवणे यांनी आरोपीला रात्री ताब्यात घेतले होते त्याने गुन्हा कबूल केला त्याला न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या 26 पर्यंत पोलिस कोठडी दिली असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्याने अजून गुन्हे केले आहेत का? व त्याचे कोण साथीदार होते ही माहिती पोलीस काढत आहे .त्याच्यावर यापूर्वी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे