मुंबई : भारतात करोना विषाणूंनी धुमाकूळ घातला असताना मुंबई पोलिसांच्या एक हजार 871 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. त्यात मुंबईत तैनात असणाऱ्या राज्य राखीव पोलिस दलाच्या 82 जणांचा समावेश आहे. तर 21 कर्मचारी करोनामुळे मरण पावले असून त्याचबरोबर 853 जण यातून ठणठणीत बरे झाले आहेत.

याशिवाय महाराष्ट्रात अन्य 33 पोलिस कर्मचाऱ्यांना करोनामुळे मृत्यू आला आहे. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. मात्र गेल्या 24 तासांत नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. राज्यात एकूण दोन हजार 562 पोलिस करोना बाधित आहेत.
राज्यातील सक्रिय बाधितांमध्ये एक हजार 497 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात 196 अधिकारी आहेत. दरम्यान सोमवारी करोनाबाधितांच्या संख्येने मुंबईत 50 हजाराचा टप्पा ओलांडला. एकून संख्या 50 हजार 85वर गेली. त्यात सक्रिय बाधित 26 हजार 345 आहे. शहरातील एकून मृतांची संख्या एक हजार 702 आहे.







