जळगाव लॉकडाऊनच्या कालावधीत अव्याहतपणे रूग्णसेवा करणार्या डॉ. परिक्षीत बाविस्कर यांच्या आरूश्री हॉस्पीटलला आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी अचानक भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. याप्रसंगी त्यांनी रूग्णांशी संवाद देखील साधला.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी रिंगरोडवरील डॉ. परिक्षित बाविस्कर यांच्या ” आरूश्री ” रूग्णालयाला भेट दिली. यावेळी रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णांची पाहणी केली. लॉकडाऊन सुरू असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आवाहन केल्यानंतर गेल्या २४ मार्च पासून डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी आपले रूग्णालय अविरतपणे सुरू ठेवले असून याठिकाणी ग्रामीण भागातील रूग्ण उपचार घेत आहे. यावेळी रूग्णांसाठी असलेल्या सोयी सुविधा पाहून पालकमंत्री ना. पाटील यांनी डॉक्टरांचे कौतूक केले.
जळगाव शहर व जिल्ह्यात खासगी रुग्णालय बंद असुन डॉक्टर मंडळींकडुन उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पालकमंत्र्यांनी “आरुश्री ” हॉस्पीटलला आज ८ जुन रोजी अचानक भेट दिली. तसेच रुग्णांना वेळोवेळी आरोग्यसेवा देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान, डॉक्टरांना देवदुत समजले जाते. काही डॉक्टर त्यांचे खासगी रुग्णालय सुरु ठेवत नसतील तर त्यांनी रुग्णांना देवदुताच्या रुपाने वैद्यकीय उपचार द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. डॉक्टरांवर कार्यवाही करण्याची अप्रिय वेळ प्रशासनावर येणार नाही, याची देखील खबरदारी घ्यावी, अशी ईशारावजा सुचनाही त्यांनी केली.
डॉ. परिक्षित बाविस्कर यांच्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ३० ते ३५ रूग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी येथील उपस्थित डॉक्टरांशी चर्चा केली. तर आपत्तीच्या कालावधीत डॉ. बाविस्कर यांनी केले .