मुंबई (वृत्तसंथा) – जेट एअरवेजचे फाउंडर नरेश गोयल यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल केला आहे. केंद्रीय तपास संस्थेने बुधवारी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तपास संस्थेच्या एका पथकाने गोयल यांच्या मुंबईमधीलघराबर छापेमारी केली. ईडी जेटच्या मागील 12 वर्षांच्या आर्थिक देवाण-घेवाणीचा तपास करत आहे. फेमा केसमध्ये गोयल, त्यांची पत्नी आणि मुलाचीही चौकशी झाली आहे.
मागच्या वर्षी ऑगस्टमध्येही तपास संस्थेने गोयल यांच्या घराबर छापेमारी केली होती. यादरम्यान त्यांच्या 19 कंपन्यांविरुद्ध देवाण-घेवाण केल्याची माहिती मिळाली होती. यापैकी 14 फर्म भारत आणि 5 परदेशात आहेत. तेव्हा ईडीने या कंपन्यात फंड ट्रांसफर केल्याचे अनेक डिजिटल पुरावे आणि महत्वपुर्ण कागदपत्र जमवले होते. ईडीने सांगितल्यानुसार, परदेशात असलेल्या कंपन्यांवर गोयल यांचे अप्रत्यक्षरित्या नियंत्रण असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपन्या अशा देशात आहेत, ज्यांना टॅक्स हेवन म्हटले जाते. आरोप आहे की, गोयल यांनी बंद झालेल्या आपल्या एअरलाइनच्या माध्यमातून देवाण-घेवाण केली.
नरेश गोयलने मागच्या वर्षी मार्चमध्ये जेट एअरवेजच्या चेयरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 14 एप्रिलला एअरलाइनने आर्थिक संकटाचे कारण देत ऑपरेशन बंद केले होते. जेटची विमाने बंद झाल्याने कंपनीत काण करणारे हजारो कामगार बेरोजगार झाले होते.