नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – अशोक नगर (मध्य प्रदेश), 22 मे : गेल्या काही दिवसांपासून पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढत आहे. असाच धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील अशोक नगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये घडला. पोलीस चौकीतच एका युवकानं रागाच्या भरात पोलीस कर्मचाऱ्याचे कान कापले. असे सांगितले जात आहे की आरोपी तरुणांनाला पोलिसांनी मास्क घालूनच आत येण्यास सांगितले. मात्र आरोपीनं मास्क घालण्यास नकार दिला. त्यानंतर रागाच्या भरात पोलीस स्थानकातच या तरुणानं पोलीस कर्मचाऱ्याचा कान कापला. आरोपी युवकानं पोलिसांना शिवीगाळही केल्याचंही सांगितलं जात आहे.
मध्य प्रदेशातील अशोकनगरमधील बहादूरपूर पोलीस चौकीत ही घटना घडली. असं सांगितलं जात आहे की पोलीस कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरता आत येऊ नको असं सांगितल्यावर तो परत गेला, परंतु थोड्या वेळाने तो पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आला. त्यानंतर आरोपीनं पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस चौकीतील कॉन्स्टेबल शाहिद खानने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मास्क न वापरल्यामुळं पोलिसांनी त्याला दुरून बोलण्यास सांगितलं. यामुळे रागात या युवकानं खिशातून चाकू काढला आणि शाहिद खान यांचा कान कापला.