नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने सगळ्या जगाला वेठीस धरलेलं असताना आता अमेरिकेने चीनला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने शेअर मार्केटमधून चीनच्या काही कंपन्यांना काढून टाकण्याची तयारी केली आहे.
अमेरिकेने संसदेने डिलिस्टींग विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. यामुळे अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड आणि बैदू इंकसारख्या चीनी कंपन्यांना आता अमेरिकन शेअर बाजारात निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. कोरोना रूग्णांची सातत्याने होणारी वाढ आणि मृत्यूंचं वाढलेलं प्रमाण हा अमेरिकेसाठी अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे अमेरिकेने तडकाफडकी डिलिस्टींग विधेयकाला मंजुरी दिलेली आहे.
विशेष म्हणजे रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी डिलिस्टींग विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीने प्रस्तावाचं कायद्यात रूपांतर होणार आहे. आणि त्यानंतर अमेरिका चीनची आर्थिक कोंडी करेल.