मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अद्याप यावर हवा तसा कंट्रोल मिळालेला नाही. तरीही सरकार आणि जनता मिळून याच्याशी लढा देत आहे. तरीही अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, प्रोड्युसर बोनी कपूर यांच्या लोखंडवाला मधील ग्रीन एकर्स घरात डोमेस्टीक हेल्प देणारा एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव असल्याचं समोर आलं आहे.
यानंतर आता असं समजत आहे की, त्यांच्या घरातील आणखी दोन नोकरांना कोरोना झाला आहे. जान्हवी, खुशी आणि बोनी कपूर सध्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. एका इंग्रजी वृत्तानुसार, आधी हाऊस हेल्प कोरोना पॉझिटीव असल्याचं समोर आलं होतं. यानंतर बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुलींसह घरातील 6 ते 7 नोकरांची टेस्ट करण्यात आली होती.
सर्वांचा टेस्ट रिपोर्टही आला आहे. यात बोनी, जान्हवी आणि खुशी निगेटीव असल्याचं समोर आलं आहे. अशी माहिती समोर आली आहे की, बोनी यांच्या घरात जे लोक कोरोना पॉझिटीव आढळले आहेत त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नाहीत.