दोन तासात आरोपी गजाआड ; एमआयडीसी पोलीसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तंबापुरा भागातील गवळीवाडा येथील रहिवासी 30 वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री मेहरुण स्मशानभूमी जवळ घडली.
मृत्युमुखी पडलेला नाना उर्फ बबलू हाटकर आपल्या प्रेयसीला त्रास देत असल्याचा संशय हल्लेखोर सुभाष निबा मिस्त्री आरोपीला होता म्हणून त्याने नाना उर्फ बबलूचा काटा काढला असावा अशीही चर्चा या भागात दबक्या आवाजात सुरु आहे. तांबापुरा भागातील गवळीवाडा येथे राहणारा नाना उर्फ बबलू हटकरला मेहरुण येथील रेणुकानगर मधील सुभाष निबा मिस्त्री 30 वर्षीय तरुणांने रात्री 11 वाजेच्या सुमारास मेहरुण स्मशानभूमी जवळ बोलवून चाकुने वार करून खून केल्याची घटन घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सहाय्य्क पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन व पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विशाल वाठोरे, सहाय्य्क फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी,हे.काँ. जितु राजपूत, विजय नेरकर,निलेश पाटील, आसीम तडवी व सचिन पाटील यांनी दोन तासात सुभाष मिस्त्री या आरोपीला गजाआड केले.
गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलिसात या आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, हा खून पूर्व वैमनस्यातून होता की यामागे आणखी काही कारण आहे ? यात एकापेक्षा जास्त हल्लेखोर होते का ? याबाबतची माहिती पोलीस प्रशासनातर्फे घेतली जात आहे.पुढील तपास साय्यक पोलीस निरीक्षक हजारे करीत आहे.