नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवरून सर्वोच्च न्यायलयातील वकीलांची कार्यालये मंगळवारी दुपारी पाच वाजल्यापासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील आदेश देईपर्यंत प्रत्यक्ष सुनावणी येणार आहे. तातडीच्या विषयांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यामातून सुनावणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. वकील आपल्या घरातून आपला युक्तीवाद करू शकतील अशी यंत्रणा सुरू करण्यावर न्यायालय काम करत आहे, असे सरन्यायाधिश एस. ए. बोबडे यांनी सांगितले. याबाबरची लिंक लवकरच वकीलांना देण्यात येईल. ते जेथे असतील तेथून आपला युक्तीवाद करू शकतील. व्हिडिओ ते कॉल करण्यासाठी त्याची लिंक कशी डाऊनलोड करायची हे लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील नोंदीकृत वकीलांच्या संघटनेने चार एप्रिलपर्यंत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारे सर्व कामकाज थांबवावे. हा भाग पूर्ण बंद करावा असे आवाहन केले आहे.